उल्का महाजन - लेख सूची

जागतिकीकरणाच्या आवारात खेडे

येत्या काळात चार मोठे औद्योगिक कॉरिडॉर प्रस्तावित आहेत. पहिला दिल्ली ते मुंबई कॉरिडॉर, दुसरा अमृतसर ते कोलकाता, तिसरा चेन्न ते बंगलोर आणि चौथा मुंबई ते बंगलोर. यामद्ये देशाची 40 टक्के जमीन सामावलेली आहे. ही सर्व जमीन संपादित होणार नसली तरी त्या पट्ट्यात 100 शहरे नव्याने वसवली जाणार आहेत. त्यासाठी प्रचंड जमीन लागणार आहे. एकट्या दिल्ली …

रेशनव्यवस्थेचे पूर्ववत सार्वत्रिकीकरण हवेच

गेल्या दीड ते दोन दशकांत भारतामध्ये गरीब, कष्टकरी समूहांसाठी असलेल्या विविध कल्याणकारी, संरक्षणाच्या योजना कोसळू लागल्या आहेत. त्यामध्ये आरोग्य, शिक्षण, रेशन या तीन्ही महत्त्वाच्या क्षेत्रांतील योजनांचा समावेश आहे. या कोसळण्याच्या घटनांबरोबरच आणखीही काही गोष्टी त्याच वेळी घडत आहेत. त्यांमधला संबंध व तर्कसंगती लक्षात घेत त्यामागचे डाव समजून घ्यायला हवेत. * गेल्या दशकात विविध सार्वजनिक योजनांचे …

स्वयंसेवी संस्थांची सद्यःस्थिती

स्वयंसेवी संस्थांबाबत आजच्या संदर्भात चर्चा उपस्थित करताना समाजाची सेवा अथवा समाजातील एखाद्या घटकाचे कल्याण करण्यासाठी अथवा समाजातील एखादी गरज भागवण्यासाठी गेल्या शतकात अथवा १९७० च्या आधी झालेले प्रयत्न व संस्था-उभारणी यासारख्या उपक्रमांपासून, आजचे स्वयंसेवी संस्थांचे वर्तुळ वेगळे काढून पाहण्याची आवश्यकता आहे. स्वयंसेवी संस्थांच्या कामाला पाया अथवा सामाजिक श्रेय त्याच पूर्वीच्या कामातून मिळाले आहे हे खरे …